Indian Man Visa Cancelled In US : 'तो' आरोप लादला अन् US मध्ये भारतीय युवकाचं स्वप्न उद्ध्वस्त; परफ्युमच्या नादात व्हिसा रद्द, ग्रीनकार्डही अडकलं

Indian Man Visa Cancelled In US : 'तो' आरोप लादला अन् US मध्ये भारतीय युवकाचं स्वप्न उद्ध्वस्त; परफ्युमच्या नादात व्हिसा रद्द, ग्रीनकार्डही अडकलं

अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय तरुणाला फक्त परफ्युमच्या बाटलीमुळे मोठा धक्का बसला आहे. भारतीय युवकाला पोलिसांनी एका आरोपाखाली अटक केली.
Published by :
Team Lokshahi
Published on

अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय तरुणाला फक्त परफ्युमच्या बाटलीमुळे मोठा धक्का बसला आहे. अरकान्सस येथे राहणाऱ्या कपिल रघू या भारतीय युवकाला पोलिसांनी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली. पण खरी गोष्ट अशी की, त्याच्याकडे असलेली बाटली परफ्युमची होती, नशेच्या पदार्थाची नव्हे.

3 मे रोजी कपिल आपल्या कारची डिलिव्हरी देण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी तपासण्यासाठी थांबवली. तपासात त्यांना "Opium" नावाची परफ्युमची बाटली सापडली. पोलिसांनी त्या शब्दाचा अर्थ ‘अफू’ असा घेतला आणि लगेचच त्यांना ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं.

कपिल यांनी पोलिसांना समजावलं की ही फक्त परफ्युम आहे, पण त्यांनी काहीही ऐकलं नाही. त्यांना विना चौकशी जेलमध्ये टाकण्यात आलं. या घटनेनंतर कपिलचा व्हिसा रद्द झाला आणि त्यांना मिळणारं ग्रीनकार्डही अडकलं. कपिल यांचं अमेरिकन मुलीशी लग्न झालं असून ते दोघं तिथे स्थायिक होण्याच्या तयारीत होते. पण या घटनेमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य विस्कळीत झालं आहे.

स्थानिक वृत्तपत्र The Saline Courier शी बोलताना कपिल म्हणाले, “मी सर्व कायदेशीर कागदपत्रं दाखवली, तरी पोलिसांनी माझं काही ऐकलं नाही. एका छोट्या बाटलीमुळे माझं सगळं आयुष्य बदललं.”

कपिलला आता जामीन मिळाला असला तरी त्यांचा व्हिसा रद्द झाल्यामुळे त्यांना देश सोडावा लागू शकतो. भारतीय समुदायाने या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून, ट्रम्प प्रशासनाच्या कठोर धोरणांवर टीका केली आहे. एका छोट्याशा परफ्युमच्या गैरसमजामुळे एका भारतीयाचं अमेरिकन स्वप्न मोडलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com