माझ्या देहाला अग्नी देवू नका..... मेडिकल कॉलेजला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचा देहदान

माझ्या देहाला अग्नी देवू नका..... मेडिकल कॉलेजला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचा देहदान

आज झाले होते हृदयविकाराचा झटक्याने निधन..!
Published by :
Sagar Pradhan

अनिल ठाकरे|चंद्रपूर : माझ्या मृत्यूनंतर माझा देहाला अग्नी देवू नका,माझा देह मेडिकल कॉलेजला दान करा,असा संकल्प विधानसभेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वरराव टेंभुर्डे यांनी केला होता.आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या देहाला अग्नी न देता कॉलेजला देहदान करण्याच्या निर्णय कुटुंबाने घेतला आहे.

विधानसभेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वरराव टेंभुर्डे यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. चंद्रपुर आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोरेश्वरराव टेंभुर्डे यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. वरोरा- भद्रावती विधानसभेचे दोन वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 81 व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला.निधनाची वार्ता कळताच राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मोरेश्वर टेंभुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय मानल्या जात होते.एकनिष्ठ व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची ख्याती होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com