Kolhapur
Kolhapur Kolhapur

Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी 67 दिवसांत 2 कोटी 44 लाखांचे दान

कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीच्या दानपेटीत मोठी रक्कम जमा झाली आहे. अलीकडील मोजणीत तब्बल २ कोटी ४४ लाखांहून अधिक रक्कम मिळाली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीच्या दानपेटीत मोठी रक्कम जमा झाली आहे. अलीकडील मोजणीत तब्बल २ कोटी ४४ लाखांहून अधिक रक्कम मिळाली आहे. ही मोजणी मागील वेळेनंतर साधारण महिन्याभराने करण्यात आली होती.

गेल्या काही आठवड्यांत राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या निवडणुका, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका, तसेच सलग सुट्ट्यांमुळे मंदिरात भाविकांची संख्या वाढली. विशेषतः शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

नगरपालिका निवडणुकांच्या काळात अनेक जिल्ह्यांतून लोक बसने कोल्हापुरात आले. त्याचबरोबर काही शाळांना ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्यानेही भाविकांची संख्या वाढली. या सर्व कारणांमुळे अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढली आणि दानरूपाने मिळणारी रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

थोडक्यात

  • कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीच्या दानपेटीत मोठी रक्कम जमा झाली आहे.

  • कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी 67 दिवसांत 2 कोटी 44 लाखांचे दान ...

  • निवडणुका, सलग सुट्ट्यांचा परिणाम आणि परदेशी भाविकांकडूनही अंबा मातेचा जागर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com