‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका” - जागतिक आरोग्य संघटना

‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका” - जागतिक आरोग्य संघटना

मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपचे सेवन केल्यामुळे तब्बल १९ लहान मुलांचा मृत्यू झाला होता.

मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपचे सेवन केल्यामुळे तब्बल १९ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. श्वसनाचा विकार जडल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला होता.

मृत्यू झालेल्या या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून डॉक-१ मॅक्स सायरप देण्यात आले होते. मुलांना २ ते ७ दिवस हे औषध दिवसातून ३ ते ४ वेळा देण्यात आले होते. प्रमाणापेक्षा जास्त औषध दिल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला होता. यासर्व पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य संघटनेनं महत्वाचा इशारा दिला आहे.

Ambronol आणि DOK-1 Max या दोन कफ सिरपचे उत्पादन घेतले जाते. याच दोन फक सिरपची चाचणी केल्यानंतर यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल तसेच इथिलीन ग्लायकोल हे घटक योग्य प्रमाणात नसल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांना मारयॉन बायोटेक या कंपनीचे वरील दोन कफ सिरप देऊ नये, असे सांगितले आहे. उत्तर प्रदेशच्या मारयॉन बायोटेक कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com