Doomsday Fish In Kerala : नवीन संकटाची चाहूल ? केरळमध्ये सापडलेल्या 'या' दुर्मिळ माशामुळे वाढवली जगाची चिंता
केरळमधील किनाऱ्यावर अलीकडेच मासेमाऱ्यांच्या जाळ्यात एक अजब आणि दुर्मीळ मासा अडकला आहे, ज्याने स्थानिकांमध्ये आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे. ‘ओअरफिश’ नावाने ओळखला जाणारा हा मासा सामान्यतः खोल समुद्रात राहतो आणि फारच क्वचित पाण्याच्या पृष्ठभागावर दिसतो. हा मासा केवळ त्याच्या असामान्य दिसण्यामुळे चर्चेत नसून, त्याच्या भोवती गुंफलेल्या गूढ विश्वासांमुळेही तो चर्चेचा विषय बनला आहे.
जपानी लोककथांनुसार, ओअरफिश हा समुद्रातील देवदूत मानला जातो आणि तो वर येतो तेव्हा त्यानंतर नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते, असं मानलं जातं. 2025 या वर्षात आधीच अनेक दुर्घटना घडल्या आहेत—अहमदाबादच्या विमान अपघातापासून ते इंद्रायणी पुलाच्या दुर्घटनेपर्यंत. अशा पार्श्वभूमीवर ओअरफिशचं वर येणं हा काही लोकांच्या मते अधिक धोक्याचा इशारा ठरू शकतो.
सोशल मीडियावर या माशाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, अनेकजण ‘हे वर्ष अघटितांनी भरलेलं असेल का?’ असा प्रश्न उपस्थित करत आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, ओअरफिश समुद्रातील हलचालींमुळे किंवा भूकंपपूर्व कंपनांमुळे पृष्ठभागावर येतो, असं काही संशोधकांचं मत आहे. मात्र, जनमानसात अजूनही त्याला एक चेतावनी मानलं जातं.