Dr. Narendra Dabholkar: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण; 3 आरोपी निर्दोष, तर 2 दोषी

Dr. Narendra Dabholkar: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण; 3 आरोपी निर्दोष, तर 2 दोषी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या प्रकरणातील 5 पैकी 3 आरोपी निर्दोष तर 2 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या प्रकरणातील 5 पैकी 3 आरोपी निर्दोष तर 2 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. शरद कळसकर, सचिन अंदुरेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे, संजीव कुनाळेकर यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. सबळ पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

या हत्या प्रकरणात आरोपी वीरेंद्रसिंह तावडेवर कटकारस्थान रचल्याचा आरोप होता. मात्र सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नसल्याने त्यांनाही निर्दोष ठरवण्यात आले आहे. तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com