Gauri Garje Case
Gauri Garje Case

Gauri Garje Case : डॉ. गौरी गर्जे प्रकरण; आज येणार शवविच्छेदन अहवाल

मंत्री पंकजा मुंडेंचे पीए गरजे यांच्या पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Gauri Garje Case) मंत्री पंकजा मुंडेंचे पीए गरजे यांच्या पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. वरळीच्या बिडीडी चाळीतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकतेच आठ ते नऊ महिन्यापूर्वी गरजे दांपत्याचा विवाह झाला होता. मात्र पती यांचे अफेअर चालू असल्याने हा प्रकार झाला असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला आहे. गौरीला आत्महेत्येपूर्वी किरणच्या आधीच्या पत्नीचे गर्भवती असल्याची कागदपत्र मिळाल्याने ती अस्वस्थ होती ती कागदपत्रे आम्हाला पाठवली होती असा गौरीच्या वडिलांनी जबाब दिला असून तिच्या वडिलांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल डॉ गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, नणंद आणि दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता डॉ. गौरी गर्जे प्रकरणात आज शवविच्छेदन अहवाल येणार असल्याची माहिती मिळत आहे. अहवालात नेमकं काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Summery

  • अनंत गर्जेची पत्नी गौरी गर्जेचं आत्महत्या प्रकरण

  • ही आत्महत्या नसून हत्या, गौरीच्या कुटुंबीयांचा आरोप

  • गौरी गर्जेचा शवविच्छेदन अहवाल आज येणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com