भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळे पुणे अपघात प्रकरणातील SITच्या अध्यक्ष; सुषमा अंधारे म्हणाल्या...

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळे पुणे अपघात प्रकरणातील SITच्या अध्यक्ष; सुषमा अंधारे म्हणाल्या...

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळे पुण्यातील अपघात प्रकरणातील घटनेची चौकशी करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळे पुण्यातील अपघात प्रकरणातील घटनेची चौकशी करणार आहेत. हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. पल्लवी सापळे या समितीच्या अध्यक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे ट्विट करत म्हणाल्या की, पोर्शे कार अपघात प्रकरणी नेमलेल्या SITच्या अध्यक्षपदी असणाऱ्या डॉ. पल्लवी सापळे यांच्यांवरच भ्रष्टाचाराचे ढिगाने आरोप आहेत. हे आरोप शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधवानी केलेले आहेत. रक्तनमुने तपासायला येणाऱ्या डॉ. सापळे यांनी रक्तातला प्लाजमा विकून 13लाख रुपये खाल्ल्याचा आरोप आहे. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com