ताज्या बातम्या
डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळाचे आज लोकार्पण
डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळाचे आज लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळाचे आज लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. यासोबतच मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
मात्र या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाही आहेत. विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण मातोश्रीवर जाऊन दिले होते. उद्धव ठाकरे यांनी खाजगी दौरा असल्याचे सांगितले.
त्यामुळे आता उद्धव ठाकरे कार्यक्रमाला येणार नसल्याने आता चर्चा रंगल्या आहेत. हा कार्यक्रम सांगलीतील सोनहिरा साखर कारखान्याच्या आवारात होणार आहे.