Shirish Valsangkar Death : मोठी अपडेट! 'त्या'च रात्री सुनेचा मनीषा मानेला फोन, नेमकी काय झाली चर्चा?
सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. सोलापूरमधील वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक होते. गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने त्यांच्या स्वतःच्या वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयित महिला आरोपी मनीषा मानेने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला.
त्यानंतर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा महेश माने उर्फ मुसळे या महिलेला पोलिसांनी अटक केली. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूला जवळपास पंधरा दिवस होत आले आहेत. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांची सून डॉ. शोनालीने त्याच रात्री उशिरा मनीषा माने यांना फोन केला होता आणि मनीषा मानेने हा कॉल रिकॉर्ड केला.
डॉ. शोनाली आणि मनीषा माने यांच्यातील चर्चा
यादरम्यान कॉलवर डॉ. शोनाली म्हणाली की, "अश्विन आणि सासू उमा यांना केलेला ई-मेल तू सासरे डॉ. शिरीष वळसंगकर यांना देखील केला का? तुझ्यामुळे त्यांनी स्वतःला गोळ्या झाडून घेतल्या. तू असं का केलंस? त्यांनी आत्महत्या केली. तू एवढ्या स्तराला का गेलीस? तुला काय कमी पडले होते" यावर मनीषा काही बोलण्याआधीच कॉल कट केला. मनीषा यांनी हा कॉल रेकॉर्ड केला होता. हे सोलापूर पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान सोलापूरमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित महिला आरोपी मनीषा मानेने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मनीषा माने सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. न्यायालयाकडून मनिषा मानेला जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.