द्रौपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती : वाचा, बैदापोसी गाव ते रायसोनी हिल्सपर्यंतचा प्रवास

अतिसामान्य कुटुंबातील व्यक्ती देशातील सर्वाच्च पदावर जातो, हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. जाणून घेऊ या द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास...
Published by :
Team Lokshahi

द्रौपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती होणार हे निश्चित झाले आहे. येत्या 25 जुलै रोजी त्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान त्यांना मिळेल. अतिसामान्य कुटुंबातील व्यक्ती देशातील सर्वाच्च पदावर जातो, हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. जाणून घेऊ या द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास...

जन्म अतिसामान्य कुटुंबात

द्रौपदी यांचा जन्म ओडिशातील मयूरगंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात संथाल आदिवासी समाजात झाला. त्यांचे लहानपण गरिबी व संघर्षात गेले. 1997 मध्ये भाजपसोबत त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्यानंतर मेहनतीच्या जोरावर राजकीय जीवनातील एक-एक शिडी पार करत 2000 मध्ये भाजप-बीजद सरकारमध्ये मंत्री झाल्या. त्यांनी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु पराभूत झाल्या. 2015 मध्ये बिहारचा राज्यपाल झाल्या. आता 2022 मध्ये देशाच्या राष्ट्रपती होत आहेत.

Droupadi Murmu
द्रोपदी मुर्मू विजयी, भारताच्या नव्या राष्ट्रपती

स्वत:चे घरही नव्हते

वयाच्या 51 वर्षापर्यंत द्रौपदी मुर्मू यांच्यांकडे स्वत:चे घर नव्हते. सरकारी विभागात त्यांनी लिपिक म्हणून काम केले. एका शाळेत मोफत ज्ञानदानाचे कार्य केले. 2009 मध्ये द्रौपदी मुर्म यांचा मुलगा लक्ष्मणचा मृत्यू झाला. त्यानंतर चार वर्षांनी 2013 मध्ये दुसऱ्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. 2014 मध्येच पती श्यामचरण अर्ध्यावरती डाव सोडून गेले. चार वर्षांत दोन युवा मुलांचा आणि पतीचा मृत्यू झाला. या धक्क्यातून बाहेर येणे त्यांना अवघड झाले होते. त्यांनी आध्यात्मचा आधार घेतला. ब्रम्ह्यकुमारी सेंटरमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्या नैराश्यातून बाहेर आल्या.

आजही संपत्ती फक्त 9 लाख

काही लोक असे असतात की किती उंचीवर गेले तरी त्या जमिनीवर असतात. देशातील राजकीय नेत्यांकडे कोट्यावधींची संपत्ती असतांना द्रौपदी मुर्मू यांची संपत्ती आमदार व मंत्री राहिल्यानंतरही आजही 9 लाख 45 हजार आहे. त्यांच्यांकडे जमीन नाही. दागिणे नाहीत. त्यांची मुलगी आजही बँकेत काम करत आहे. सामान्यातील सामान्य व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर आता विराजमान होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com