डीआरआयने उध्वस्त केले 8 किलो सोन्याचे रॅकेट; किंमत 4 कोटी, 1 लाखाची रोकडही जप्त

डीआरआयने उध्वस्त केले 8 किलो सोन्याचे रॅकेट; किंमत 4 कोटी, 1 लाखाची रोकडही जप्त

केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) मुंबईत सोन्याच्या तस्करीचे आणखी एक रॅकेट उध्वस्त केले असून या कारवाईत 8 किलो सोने जप्त केले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) मुंबईत सोन्याच्या तस्करीचे आणखी एक रॅकेट उध्वस्त केले असून या कारवाईत 8 किलो सोने जप्त केले आहे. त्याची किंमत 4 कोटी 78 लाख रुपये इतकी असून या छाप्यांदरम्यान एक लाख 22 हजार रुपयांची रोख रक्कम देखील जप्त केली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अन्य लोकांचा शोध सुरू आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झवेरी बाजार येथे तस्करीच्या माध्यमातून आलेल्या सोन्याचे व्यवहार हो असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मिळाली. त्यानंतर 13 व 14 ऑक्टोबर रोजी अधिकाऱ्यांनी तिथे छापेमारी केली असता तिथे एक किलो सोन्याचे परदेशातून आणलेले बार आढळून आले. मात्र, त्यांची कोणताही पावती किंवा कागदपत्रे संबंधित व्यक्तीकडे नव्हती.

त्यानंतर त्या व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या ठिकाणी छापे टाकले असता तिथे 7 किलो सोने व 1 लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. त्याचाही हिशोब न मिळाल्याने ते देखील जप्त करण्यात आले आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी आणखी चार ठिकाणी छापेमारी केली असता एके ठिकाणी सोने वितळवण्याचा कारखाना आढळून आला. त्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com