रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला; युक्रेनकडून पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न?

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला; युक्रेनकडून पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर ड्रोन हल्ला करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर ड्रोन हल्ला करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रध्यक्षांच्या निवासस्थान क्रेमलिनवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात पुतिन सुरक्षित असल्याची माहिती रशियाने दिली आहे. तसेच, युक्रेननेच पुतिन यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही रशियाने केला आहे.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला; युक्रेनकडून पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न?
...म्हणून मी राजीनाम्याचा निर्णय माझ्या मनाने घेतला; शरद पवारांनी अखेर सांगितले कारण

रशियाच्या म्हणण्यानुसार, पुतीन यांच्या हत्येच्या प्रयत्नात क्रेमलिनवर काल रात्री दोन ड्रोनने हल्ला केला. रशियाने याला दहशतवादी हल्ला म्हंटले आहे. त्यांनी युक्रेनने बनवलेले दोन ड्रोन पाडले आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे. 9 मे रोजी होणाऱ्या विजय दिनाच्या परेडपूर्वी हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पुतिन यांच्यावर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र यामध्ये पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही. या हल्याचे जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशाराही रशियाने युक्रेनला दिला आहे. ड्रोन हल्ल्यानंतरही 9 मे रोजी होणारी विजय दिन परेड वेळेवर होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com