पुण्याच्या हॉटेलमधील ड्रग्ज पार्टी प्रकरण; राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक निलंबित

पुण्याच्या हॉटेलमधील ड्रग्ज पार्टी प्रकरण; राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक निलंबित

पुण्यात एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यात एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हॉटेलमधील वॉशरुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस निरीक्षक वी बी बोबडेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्तांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com