दारुसह ‘चकना’ खायला मिळाला नाही म्हणून कुत्र्याच्या पिल्लांची शेपटी आणि कान कापून  खाल्ले
Admin

दारुसह ‘चकना’ खायला मिळाला नाही म्हणून कुत्र्याच्या पिल्लांची शेपटी आणि कान कापून खाल्ले

दारुच्या नशेत माणूस काय करेल याचा काही नेम नाही. असाच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.

दारुच्या नशेत माणूस काय करेल याचा काही नेम नाही. असाच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. एका व्यक्तीने दारुच्या नशेत कुत्र्याच्या पिल्लांची शेपटी आणि कान कापून खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही पिल्लं जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका पिल्लाचे कान आणि दुसऱ्याची शेपूट कापल्यानंतर दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. आरोपीने दारुसोबत शेपटी आणि कान खाऊन टाकले. दोन्ही पिल्लांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

प्राणीप्रेमी आणि पिपल फॉर अॅनिमल्स संघटनेचे सदस्य धीरज पाठव यांनी याप्रकऱणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com