पुण्याच्या वाघोली अपघात प्रकरणी डंपर मालकाला अटक

पुण्याच्या वाघोली अपघात प्रकरणी डंपर मालकाला अटक

पुण्याच्या वाघोलीतील केसनंद फाट्यावर ही घटना घडली
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • पुण्यात डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना

  • पुण्याच्या वाघोलीतील केसनंद फाट्यावर ही घटना घडली

  • डंपर मालकाला पोलिसांनी केली अटक

पुण्यात डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्याच्या वाघोलीतील केसनंद फाट्यावरील ही घटना असून वाघोली येथील केसनंद फाट्यावरती पुण्याकडून येणाऱ्या भरघाव डंपरने फूट पाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले.

या घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले. याच पार्श्वभूमीवर आता डंपर मालकाला पोलिसांनी अटक केली असून डंपरवरील चालक मद्यप्राशन करत असल्याची माहिती असून डंपर चालकाने मद्यप्राशन केल्याची माहिती मिळते आहे.

यासोबतच डंपर चालकाला न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com