Baramati Malgoan Election : मोठी बातमी, अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले विजयी

बारामतीत माळेगाव कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अजित पवारांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसलेंचा दुसऱ्या फेरीत विजयी झाले.
Published by :
Prachi Nate

बारामतीत माळेगाव कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच माळेगाव कारखान्याची पहिली फेर मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्याचसोबत बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरू असून, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली असणारे नीलकंठेश्वर पॅनलचे 16 उमेदवार आघाडीवर आहेत.

तर तावरे सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान दुसऱ्या फेरीत नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसलेंचा विजयी झाले असून, जवळपास 1400 मतांनी रतनकुमार भोसले यांचा विजय झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com