तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचा हाहाकार; आतापर्यंत 24,680 लोकांचा मृत्यू
Admin

तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचा हाहाकार; आतापर्यंत 24,680 लोकांचा मृत्यू

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आणि त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत.

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आणि त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.८ इतकी मोजली गेली. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. तुर्की आणि सीरियामध्ये मोठी नैसर्गित आपत्ती कोसळली आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे. भारतीय बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आतापर्यंत मृतांची संख्या 24 हजारांच्या पुढे गेली आहे. 85 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली.या भीषण आपत्तीतील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.

भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी भारताने मदतीचा हात दिला आहे. 'ऑपरेशन दोस्त'द्वारे भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे. भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन पथकांना विशेषत: श्वानपथक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक उपकरणांसह भारतातून तुर्कीला पाठवण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com