चंद्रपूरला पुन्हा भूकंपाचे धक्के; पालकमंत्री म्हणाले " वस्तुस्थिती तपासून अहवाल द्या ! "
अनिल ठाकरे, चंद्रपूर
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसराला रविवारी भूकंपाचे धक्के जाणविले. या घटनेला 24 तास उलटले नसताना पुन्हा ( सोमावार ) पाच वाजून दहा मिनिटांनी शहरातील लालपेट परिसरात पुन्हा धक्के जाणवले. जाणवणारे धक्के नैसर्गिक नाहीत आंतर भुस्तर खचल्याने कंप जाणवला असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. दरम्यान भूकंपसदृश घटनेची वस्तूस्थिती तपासून अहवाल द्या असे निर्देश पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
बाबुपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरात रविवारला जमिनीत दोन कि.मी. परिसरात भूकंप जाणवल्या चर्चा पुढे आल्यात.हा कंप जमिनीत ७०० ते १००० मीटर आत झाला असेल, अशी शक्यता आहे. या घटनेला चोवीस तास उलटले नसताना काल पुन्हा पाच वाजता पुन्हा धक्के जाणवल्याच्या चर्चा पुढे आल्या.
लोकांनी भूकंपाचे धक्के अनुभवले. हा भूकंप नैसर्गिक नाही. या परिसरात जमिनीत कंप झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. परिसरात वकोलिच्या कोळसा खाणी आहेत. या क्षेत्रातील भूमिगत आणि खुल्या खाणीत साचलेले पाणी खोल भूगर्भात शिरून भूस्तर खचल्याने भूकंप जाणवतो, असे अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी सांगितले. जुन्या भूमिगत खाणी बंद करताना आणि पुनर्भरण करताना वाळू भरली गेली नसेल तर, जमीन खचून असे कंप जाणवतात, जमिनीवर भेगा पडतात, जमीन खचते अशा घटना घुग्घुस येथे घडल्या आहेत. खाणीत कोळसा काढण्यासाठी वापरलेल्या सुरुंग स्फोटानेसुद्धा असा कंप जाणवतो, असे खगोल अभ्यासक चोपणे यांनी
दरम्यान, यामागील वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे काही नुकसान झाले असल्यास त्याची माहितीदेखील कळवावी व योग्य त्या उपाययोजना कराव्या, असेही निर्देशित करण्यात आले आहे.