रायगड जिल्ह्यात पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के

रायगड जिल्ह्यात पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के

रायगड जिल्ह्यात पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

रायगड जिल्ह्यात पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. पेणच्या तिलोरे, वरवणे तसेच सुधागड तालुक्यातही महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी भागात जमिनीला हादरे बसल्याची माहिती मिळत आहे.

जमिनीला हादरे बसून भुगर्भातून आवाज आला, घरातील भांडी हलली, कुठलेही नुकसान झालं नाही अशी माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली आहे. मात्र भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संकेत स्थळावर याची मात्र नोंद नाही आहे. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांची गावांना भेट दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com