दक्षिण तुर्कीत 7.9 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून प्रचंड जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.भूकंप स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:17 वाजता सुमारे 17.9 किमी खोलीवर झाला. सोमवारी दक्षिण तुर्कीमधील गॅझियानटेपजवळ 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. असे मिळालेल्या माहितीनुसार समजते.
हा भूकंप दक्षिण तुर्कीमध्ये झाला. बीएनओ न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, येथे अनेक अपार्टमेंट आणि इमारती कोसळल्या आहेत. याशिवाय सिरीया, लेबनान, सिपरस, जॉर्डन, इजिप्त, आणि इजराइलला देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
या भूकंपामुळे तुर्कीत प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून प्रचंड जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक वेळेनुसार तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंप झाला. तुर्कस्तानच्या गॅझियानटेपजवळ भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळतेय.