ताज्या बातम्या
यवतमाळमधील मारेगाव तालुक्यात भूकंप सदृश धक्के
यवतमाळमधील मारेगाव तालुक्यात भूकंप सदृश धक्के बसल्याची माहिती मिळत आहे.
संजय राठोड, यवतमाळ
यवतमाळमधील मारेगाव तालुक्यात भूकंप सदृश धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. मारेगाव आणि पांढरकवडा तालुक्यातील काही गावांना भूकंप सदृश धक्के जाणवल्याने भितीने नागरिक घराबाहेर पडले.
कुंभा, पिसगाव, पांढरकवडा, नेत, चिंचाळा, वडगाव, मांगरूळ आदी गावांमध्ये शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान हे धक्के जाणवले. केंद्र सरकारच्या भूकंप मापक यंत्रावर कोणतीही नोंद नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
यासंदर्भात कोणतीही नोंद नाही. त्यामुळे हे धक्के नेमकं कशाचे होते याचा अद्याप उलगडा झाला नाही.