ताज्या बातम्या
Tibet Earthquake : तिबेटमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; तीव्रता 5.7 रिश्टर स्केल
तिबेटमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत.
(Tibet Earthquake ) तिबेटमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप असल्याची माहिती मिळत आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर (भारतीय वेळेनुसार) 2:41 वाजता तिबेटमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 इतकी होती. भूकंपाचे केंद्र तिबेट प्रदेशात होते. भूकंपाचा परिणाम हा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही जाणवला असल्याचे समजते. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानाची माहिती मिळालेली नाही.