Eat This Foods In Morning Breakfast
Eat This Foods In Morning Breakfast Eat This Foods In Morning Breakfast

Eat This Foods In Morning Breakfast : सकाळचा नाश्ता, दिवसभराची ऊर्जा! थकवा आणि पचनासाठी 4 सुपरफूड्स

सकाळपासूनच थकवा, आळस किंवा पोटाच्या तक्रारी जाणवत असतील, तर त्यामागे चुकीचा नाश्ता कारणीभूत असू शकतो.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Eat This Foods In Morning Breakfast : सकाळपासूनच थकवा, आळस किंवा पोटाच्या तक्रारी जाणवत असतील, तर त्यामागे चुकीचा नाश्ता कारणीभूत असू शकतो. झोपेनंतर अनेक तासांनी शरीराला अन्न मिळते, त्यामुळे सकाळी काय खाल्ले जाते यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा अवलंबून असते.

अनेकजण नाश्ता करत नाहीत किंवा फक्त चहा-बिस्किटांवर दिवस सुरू करतात. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि भूक, चिडचिड तसेच पचन बिघडते. योग्य नाश्ता केल्यास ताकद वाढते, लक्ष केंद्रित राहते आणि भूक नियंत्रणात राहते. तज्ज्ञांच्या मते, सकाळी काही पदार्थ रात्री भिजवून रिकाम्या पोटी घेतल्यास शरीराला मोठा फायदा होतो. हे पदार्थ नैसर्गिक ऊर्जा देतात आणि पोटाच्या समस्या कमी करतात.

ओट्स हा हलका पण ताकद देणारा पर्याय आहे. तो पोट भरून ठेवतो आणि हृदयासाठीही चांगला मानला जातो. मोड आलेली कडधान्ये शरीराला आवश्यक खनिजे देतात आणि पचन सुधारतात. रात्री भिजवलेले जिरे पाणी सकाळी प्यायल्यास गॅस व अपचनावर आराम मिळतो. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शरीराची ताकद वाढवण्यास मदत करते. सकाळचा नाश्ता म्हणजे फक्त जेवण नाही, तर दिवसभर निरोगी राहण्याची सुरुवात आहे. योग्य सवयी अंगीकारल्यास थकवा आणि पोटाच्या तक्रारी आपोआप दूर राहतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com