बातम्या
Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर पुन्हा ईडीची धाड
हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर पुन्हा ईडीची धाड पडली आहे
हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर पुन्हा ईडीची धाड पडली आहे. पहाटे 4 ते ५ अधिकाऱ्यांचे पथक मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहे. दीड महिन्यात ईडीने दुसऱ्यांदा मुश्रीफांच्या घरी धाड टाकली आहे.
ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन तपासणी सुरू केली आहे.
याच्या अगोदर ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील नातेवाईकांच्या निवासस्थानी तसेच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यालयात ईडीच्या पथकाने छापा टाकला होता.