हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुसऱ्या दिवशीही ईडीचे अधिकारी दाखल

हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुसऱ्या दिवशीही ईडीचे अधिकारी दाखल

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुसऱ्या दिवशीही ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत.
Published on

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुसऱ्या दिवशीही ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. सकाळपासून त्यांनी पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात केली आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापसी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ११ जानेवारी रोजी 'ईडी'ने छापे टाकले होते.

कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. ED चे अधिकारी जिल्हा बँकेत आले आणि सकाळपासूनच कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.

अचानक बँकेत ईडीचे अधिकारी घुसल्याने कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली. बँकेच्या मुख्य कार्यालयासह सेनापती कापशी शाखेवर ही छापेमारी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागच्या सहा तासांपासून ईडीचे अधिकारी बँकेत कागदपत्र तपासत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com