ED Issues Notice to South Superstar : 'या' अभिनेत्रीचा पती अडकला मनी लॉड्रिंगप्रकरणात, मेहुणीने एकेकाळी गाजवलेलं बॉलीवूड

ED Issues Notice to South Superstar : 'या' अभिनेत्रीचा पती अडकला मनी लॉड्रिंगप्रकरणात, मेहुणीने एकेकाळी गाजवलेलं बॉलीवूड

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू याला ईडीने नोटीस बजावली आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू याला ईडीने नोटीस बजावली आहे. हैदराबादमधील दोन रिअल इस्टेट कंपन्यांशी संबंधित मनी लॉड्रिं प्रकरणी अभिनेत्याला समन्स धाडण्यात आला आहे. महेश बाबूने साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपच्या संशयास्पद प्रकल्पांसाठी एन्डॉर्समेन्ट केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साई सूर्या डेव्हलपर्सच्या प्रकल्पांचे समर्थन करण्यासाठी त्याला 5.9 कोटी रुपये मिळाले होते, त्यापैकी 3.4 कोटी रुपये त्याला चेकच्या माध्यमातून आणि 2.5 कोटी रुपये रोख देण्यात आले. ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे की, रोख रक्कम ही फसवणुकीद्वारे जमा झालेल्या रकमेचा एक भाग आहे.

महेश बाबू साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टान असून त्यांनी अनेक जाहिरातीही केल्या आहे. एकेकाळी मिस इंडिया राहिलेली आणि हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिचे पती आणि अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिचे जिजू महेश बाबू महाराष्ट्राची जावई आहेत. मात्र त्यांच नाव आता मनी लाँड्रिंगप्रकरणात येत आहे. याप्रकरणी भाग्यनगर प्रॉपर्टीज लिमिटेडचे संचालक नरेंद्र सुराणा, साई सूर्या डेव्हलपर्सचे मालक के सतीश चंद्र गुप्ता आणि इतरांविरुद्ध तेलंगणा पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता. या कंपन्यांनी अनधिकृत लेआउट आणि चुकीच्या नोंदणीद्वारे एकाच जमिनीची अनेक वेळा विक्री करून खरेदीदारांकडून कोट्यवधी रुपये आगाऊ वसूल केल्याचा आरोप आहे.

महेश बाबूने या कंपन्यांच्या केलेल्या समर्थनामुळे अनेकांना प्रभावित केल्याचे समजते. साई सूर्या प्रकल्पाला अभिनेत्याकडून मिळालेल्या या समर्थनामुळे अनेक लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले गेले, ज्यांना या उपक्रमामागील मोठ्या फसवणुकीची पूर्णपणे माहिती नव्हती. मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने 16 एप्रिल रोजी अनेक ठिकाणी छापे टाकले. सुराणा ग्रुप आणि साई सूर्या डेव्हलपर्सवर ही कारवाई करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com