ईडी चौकशीला आज हजर राहणार नाही; मुदतवाढ मागणार - हसन मुश्रीफ

ईडी चौकशीला आज हजर राहणार नाही; मुदतवाढ मागणार - हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ आज ईडीसमोर हजर राहणार नाहीत आहेत.

हसन मुश्रीफ आज ईडीसमोर हजर राहणार नाहीत आहेत. मुश्रीफ यांना हजर राहण्यास ईडीने नोटीस बजावली होती. मात्र आता अशी माहिती मिळत आहे की, ईडीसमोर हजर राहणार नाही आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी शनिवारी ईडीकडून तब्बल साडे नऊ तास छापेमारी केली गेली. दीड महिन्यांत तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘सरसेनापती संताजी घोरपडे’ कारखान्याशी निगडीत कर्ज प्रकरण ईडीकडून हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले असून आज ईडी कार्यालयात त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज हसन मुश्रीफ कुटुंबाला भेटण्यासाठी कागलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मी दोन दिवस बाहेर होतो. ईडी चौकशीला आज हजर राहणार नाही; मुदतवाढ मागणार. असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com