ताज्या बातम्या
पानाचा विडा महागणार; पान दुपटीनं महागलं; जाणून घ्या किंमत
कुठल्याही कार्यक्रमामध्ये विड्याच्या पानाचा उपयोग केला जातो.
कुठल्याही कार्यक्रमामध्ये विड्याच्या पानाचा उपयोग केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये विड्याच्या पानाचे महत्व आहे. काही लोकांना जेवणानंतर पान खायची सवय असते. पावसाचा फटका आता खायच्या पानालासुद्धा बसला आहे. पानाच्या किमतीदेखिल आता वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील गावरान पानांचे दर 20 टक्क्यांनी, तर कलकत्ता पानांचे दर दुप्पट वाढले आहेत. गावरान पाने 100 रुपये शेकडा दराने मिळत आहेत. तर कलकत्ता पाने 600 रुपये झाले आहेत. यासोबतच मसाला पान 25 रुपयांना मिळणार असल्याचे समजते.
चेन्नई येथील मद्रासी पान येणे बंद झाले आहे. पाऊस. वाढते तापमान याचा परिणाम हा खायचा पानावर झालेला पाहायला मिळत आहे.