Egypt Bus Accident
Egypt Bus AccidentTeam Lokshahi

Egypt Bus Accident : इजिप्तमध्ये बसचा भीषण अपघात

इजिप्तच्या उत्तर डकहलिया प्रांतातील मिस्रमध्ये बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याची घटना घडली.

इजिप्तच्या उत्तर डकहलिया प्रांतातील मिस्रमध्ये बसच्या भीषण अपघात 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याने 22 प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच, या घटनेमध्ये 7 जण जखमी झाल्याची माहिती मिळते.

इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत बस ही महामार्गावरून घसरुन मन्सौरा कालव्यात पडली. बस कालव्यात पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सुरक्षारक्षकांनी धाव घेत बचाव कार्याला सुरूवात केली. त्यानंतर घटनास्थळी 18 रुग्णवाहिका दाखल झाल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. तसेच, या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com