ताज्या बातम्या
एकनाथ खडसेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट: म्हणाले...
एकनाथ खडसे यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
एकनाथ खडसे यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काल रात्री सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याची चर्चा सुरु आहे. बैठकीवेळी इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी मतदारसंघातील विकासकामांच्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी गेलो होतो. राजकीय विषयावर चर्चा कुठलीही झालेली नाही. असे एकनाथ खडसे म्हणाले.