ताज्या बातम्या
Eknath Khadse : "विरोधी पक्षनेता जर नियुक्त केला तर भ्रष्टाचाराचे प्रश्न ऐरणीवर येऊ शकतात याची सरकारला भीती"
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप विरोधीपक्षनेता ठरला नाही. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, "लोकशाहीमध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे महत्व आहे. याठिकाणी संख्याबळ लक्षात न घेता विरोधी पक्षाची नियुक्ती किंवा मान्यता सरकारच्या माध्यमातून देण्याची गरज आहे. आज शेवटचा दिवस आहे अपेक्षा करुया की, आजतरी सरकारच्या माध्यमातून यावर चर्चा होऊन राज्याला नवा विरोधी पक्षनेता मिळेल."
"महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं अलिकडे निदर्शनात आली. विरोधी पक्षनेता जर याठिकाणी नियुक्त केला तर असे भ्रष्टाचाराचे प्रश्न ऐरणीवर येऊ शकतात आणि ही भीती वारंवार सरकारला वाटते." असे एकनाथ खडसे म्हणाले.