भाई, भाऊ दोघेही जिंकले; फडणवीस हंडोरेंचे मतं फोडण्यात यशस्वी?

भाई, भाऊ दोघेही जिंकले; फडणवीस हंडोरेंचे मतं फोडण्यात यशस्वी?

राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भाजपनं महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता, त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.

Maharashtra Legislative Council Elections Results : राज्याचं लक्ष आज विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे लागलं होतं. आज सकाळी सर्व आमदारांनी मतदानाला सुरुवात केली. त्यानंतर मतदान पार पडलं, मात्र काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. या आक्षेपामुळे पुन्हा एकदा अशी शंका निर्माण झाली होती की, आज सुद्धा राज्यसभेप्रमाणे निकालाला उशीर होणार का? मात्र काँग्रेसचा आक्षेप राज्या आणि राष्ट्रीय निवडणूक आयोगानं फेटाळून लावला. त्यामुळे सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर निवडणूक आयोगानं सर्व मतं वैध ठरल्याचं सांगितलं आणि अखेर निकाल जाहीर झाला. भाजपचे श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड, राम शिंदे, प्रवीण दरेकर मैदानात होते. हे सर्व उमेदवार विजयी करत देवेंद्र फडणवीसांनी मात्र बाजी मारली आहे.

भाई, भाऊ दोघेही जिंकले; फडणवीस हंडोरेंचे मतं फोडण्यात यशस्वी?
Vidhan Parishad Election Result : कोणाला किती मते? येथे पाहा

शिवसेनेचे सचिन आहिर, भाजपच्या उमा खापरे, प्रसाद लाड, राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, हे देखील विजयी झाले आहेत. तसंच काँग्रेसच्या भाई जगताप यांचाही विजय झाला आहे. या संपूर्ण निवडणुकीत भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्याकडे लक्ष लागून होतं. मात्र भाई जगताप आणि लाड दोघेही जिंकले पण चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मतं फोडण्यात यशस्वी झाल्याचं बोललं जातंय.

Lokshahi
www.lokshahi.com