Sanjay Raut On Eknath Shinde : महापालिकेच्या पैशातून नगरसेवक विकत घेतले'; संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यावर गंभीर आरोप
काल झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकारांची चांगलीच तारांबळ केली आहे. या पावसाने भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये संपुर्ण पाण्याखाली केली होती. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा झाला आहे.
संजय राऊत म्हणाले की, "कालच्या मेट्रोच्या कामांमध्ये सत्ताधाऱ्यांनी दीड हजार रुपये कोटी रुपयांची दलाली खाल्ली आहे, मी आता सागंतो अशिष शेलार यांनी समोर यावे. गेल्या साडेतीन वर्ष मुंबई यांच्या हातामध्ये आल्यापासून सत्ताधाऱ्यांनी 35 हजार कोटींची कमीशनबाजी केली. त्या पैश्यातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले अशिष शेलारांनी यांच्यावर बोला. निवडणुका का घेतल्या नाहीत?, लोकप्रतिनिधीच्या हाती तुम्ही सत्ता का दिली नाहीत? 35 हजार कोटीहून जास्त रक्कम महायुतीने सामन्य लोकांची लुटलेली आहे."
पुढे संजय राऊत म्हणाले की, "काल भुयारी रेल्वे जी बुडाली ती याच भष्ट्राचारी पैश्यातून तयार केल्यामुळे बुडाली आहे, राऊतांचा सरकारवर निशाणा. फक्त श्रेय पाहिजे म्हणून घाईघाईने उद्घाटन केल आहे. काय झालं की, आमच्यावर खापर फोडतात. देशात काय झालं की, पंडीत जवाहरलाल नेहरु, मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, मागील साडेदहा वर्ष सत्ताधाऱ्यांनी काय करताय, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री हे सगळे कुठे आहेत. 3-4 वर्ष मुंबईत आणि महाराष्ट्रात सत्ता कोणती होती? सत्ताधाऱ्यांनी नुसतं खा-खा केलं. पुन्हा काय झालं की, उद्धव ठाकरे, अमुक तमुक लाज वाटली पाहिजे, तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवताय. काल मुंबई बुडते आहे, त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस हे गृहमंत्री अमितशाह त्यांच्यासोबत राजकारण करायला. मेट्रोची कामे आम्ही नाही केली, पण त्याचे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स गुजरातचे होते. मुंबई महापालिकेची 3 मोठी साडेचार हजार कोटींची कॉन्ट्रॅक्टर्स अहमदाबादला देण्यासाठी काही नियम बदलेले जातात आहे. त्याचा खुलासा मी करतो."