औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शिवभक्तांची भावना
सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. जरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे.यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवभक्तांच्या भावनांचा आदर करतो. औरंगजेबाने संभाजी महाराजांनी महाराजांचा खूप छळ केला. औरंगजेबाच्या क्रौर्याची परिसीमा गाठली होती. आशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात कशाला? जी भावना शिवभक्तांची आहे तीच भावना माझी आहे".
तसेच नंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, "जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये. क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. तो महाराष्ट्राचा दुश्मन होता, देशद्रोही, राष्ट्रद्रोही होता, अशा या औरंग्याच्या खाणाखुणा महाराष्ट्रात कशाला पाहिजे. जे उदात्तीकरण करतात त्यांचा निषेध केला पाहिजे".