Eknath Shinde: श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंच उत्तर
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद त्यांच्या गावी साताऱ्यातील दरेगाव येथे पार पडली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीची चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट करत महायुती सरकारमध्ये समन्वयाने काम सुरू असल्याचे सांगितले. तसच विरोधकांवर टीका देखील केली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आम्ही ज्या योजना केल्या त्या निवडणुकीमध्ये आम्हाला त्याचा प्रतिबिंब पाहावयास मिळालं. महायुतीला जे यश मिळालेले आहे ते कधीही न विसरण्यासारखे आहे.
जनतेच्या मनामध्ये मी काम केलं जनतेचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं. मी कायमस्वरूपी म्हणायचो की सीएम म्हणजे हा कॉमन मॅन, म्हणून मी कायमस्वरुपी समाजामध्ये राहिलो. कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत जे दुःख आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका झाल्या दोन्हीही उपमुख्यमंत्री माझ्याबरोबर होतेस, सगळे सहकार्य माझ्याबरोबर होते आणि मिळालेले यश हे प्रचंड आहे आणि म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणूनच मागच्या आठवड्यामध्येच मी प्रेस कॉन्फरन्स घेतली.
यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री व नरेंद्र मोदी आदरणीय मोदी अमित भाई शहा गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष या सर्व निर्णय मुख्यमंत्री पदासाठी घेतील आणि माझा या निर्णयाला पाठिंबा असेल त्यामुळे कोणताही किंतु परंतु कोणाच्या मनामध्ये नसावा मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि माझा निर्णय मी घेतलेला आहे.
महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि त्या चर्चेतूनच निर्णय बाहेर निघतील. महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून मत केलेले आहेत मतांचा वर्षाव केलेला आहे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या जनतेला देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लोकांच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त काम करणार आहोत.
उपमुख्यमंत्रीपदी श्रीकांत शिंदे यांचे नाव समोर आहे चर्चा सुरू आहे त्यांच्या तर होणारच. या फक्त चर्चा आहेत. आता बैठक होणार आहे. बैठकीमध्ये ज्यावेळेस ठरेल दुसऱ्या बैठकीमध्ये बऱ्यापैकी साधक-बाधक चर्चा होईल त्यामधून योग्य तो निर्णय बाहेर निघेल महाराष्ट्राच्या हिताचा तो निर्णय लागेल.
आता विरोधकांना काही काम राहिलेले नाही. आमच्यामध्ये समन्वय आहे. आमच्यामध्ये कोणताही दुरावा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांना काहीच काम नाही त्यांना साधं विरोधी पक्ष नेता देखील होता येत नाही. त्यामुळे ईव्हीएम वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीने एक नरेटीव तयार करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे.
महाराष्ट्र मधील लाडक्या बहिणींनी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी विशेष करून लाडक्या बहिणींनी जो योगदान दिले आमच्या विजयासाठी ते महत्त्वाचे आहे. सगळ्यांच्या एकजुटीच्या आशीर्वादीचा प्रेमामुळेच हा विजय शक्य झाला. माझी तब्येत चांगली आहे आता निवडणुकीच्या काळामध्ये खूप मोठी धावपळ झाली होती म्हणून मी विश्रांतीसाठी इथे आलो होतो.