Eknath Shinde | मुंबईच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी एकनाथ शिंदे काय म्हणाले? जाणून घ्या...
लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी आज भव्य संमेलन पार पडत आहे. या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचपार्श्वभूमिवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखत देण्यास सुरुवात केली.
"लोकं म्हणतात मी नाराज झालो की गावी जातो...": एकनाथ शिंदे काय म्हणाले?
याचपार्श्वभूमिवर एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी गावी जातो, तेव्हा लोक म्हणतात एकनाथ शिंदे नाराज झाले.. एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने गावी शेती करतात. मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी 10-10 तास प्रवास करून गावी जाऊ का? तेवढ्या वेळेत मी किती काम करेन... ज्यांना काम करायची सवय नाही, ते तर बोलणारचं ना... मी वेळेला महत्त्व देतो माझ्यासाठी वेळ महत्त्वाची आहे".
"शेतकरी आमचा केंद्रबिंदू; 1 रुपयांत आम्ही पिकविमा देत आहोत ": एकनाथ शिंदे
ग्रामीण विकासावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "समृद्धी महामार्ग जो तयार केला आहे तो 14 जिल्ह्यांना जोडणारा आहे तो ग्रामीण विकासासाठीच केलेला आहे. मुंबई कोकण महामार्गासाठी एक्सेस कंट्रोल रस्ता आम्ही करतो. त्याचसोबत सगळे सागरी मार्ग एकत्र करत कोस्टल महामार्ग केलेला आहे. त्यामुळे पर्यटन वाढणार आणि त्याचा फायदा तेथील ग्रामीण लोकांना होणार. लोक म्हणतात शेतकऱ्यांना तुम्ही काय दिल? अडीच वर्षामध्ये आम्ही 45 हजार कोटींची योजना शेतकऱ्यांना दिली. शेतकरी सन्मान योजना आम्ही सुरु केली. आमच्यासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. 12 हजार मोदी सरकार देत त्याचसोबत आमच सरकार देखील 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देत. एक रुपया पिक विमा योजना आम्ही सुरु केली त्यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा होत आहे".
"मुख्यमंत्र्यांच काम काय घरात बसायचं का?" कय म्हणाले शिंदे
पुढे मुंबईच्या विकासावर एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे म्हणून आम्ही मुंबईवर फोकस केलं. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं आणि कमिशनरला बोलावलं... रस्त्यावर खड्डे का आहेत? असं विचारलं... दरवर्षी रिपेरिंग करून काढायचा पांढरा आणि पांढऱ्याचा काळ करतात. हे लोकांचे पैसे आहेत आणि पैसे असताना लोकांना खड्ड्यांमध्ये प्रवास करायला का लावला? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
तसेच पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, लोक खड्ड्यांमध्ये प्रवास करून मृत्युमुखी पडली, त्याचवेळी आम्ही सांगितल मुंबईतले सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले पाहिजेत असा मोठा निर्णय आम्ही घेतला. त्यानंतर पहिला फेज दुसरा फेज असे अनेक हजार कोटींचे प्रकल्प काढले. पुढच्या फेसमध्ये खड्डे मुक्त मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई आणि लवकरच ट्रक्समुक्त मुंबई आम्हाला करायचा आहे आणि लवकरच भ्रष्टाचार मुक्त मुंबई देखील आम्ही करणार आहोत. मुंबईचे रस्ते आम्ही धुतले, कधी तुम्ही पाहिलं होतं का? मुख्यमंत्र्यांना रस्ते धुताना. डीप क्लीन ड्राईव्ह हे आम्ही सुरू केलं. त्यामुळे रस्त्यावरच प्रदुषण कमी झालं त्यावेळी लोकांनी विचारल काय रस्ते धुताय? मुख्यमंत्री रस्ते धुतात का? मग आम्ही पण विचारल, मुख्यमंत्री असताना घरी बसायचं असतं का?", अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.