ताज्या बातम्या
एकनाथ शिंदे यांनी परदेशी पाहुण्यांसोबत साजरे केले हिंदू नववर्ष
मात्र ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असलेले दिसतात. आज नववर्षांच्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिंदे हे परदेशी पाहुण्यांबरोबर दिसून आले. एकनाथ शिंदे यांनी परदेशी पाहुण्यांबरोबर मिसळवर ताव मारताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे परदेशी पाहुण्यांना भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.