Eknath Shinde House: ... म्हणूनच लाडक्या बहीणचा लाडका भाऊ, ही ओळख निर्माण झाली
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता त्याच्यावर तोडगा निघालेला असून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग आता मोकळा झालेला पाहायला मिळत आहे. कारण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजा दुपारी 3 वाजता एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यादरम्यान शिंदे म्हणाले की,
...म्हणून मी त्यांचा सख्खा लाडका भाऊ झालो- एकनाथ शिंदे
आमचं राज्य येण्याआधी मविआच्या काळात आपल राज्य हे तिसऱ्या क्रमांकावर होत, पण आलो आमचं महायुतीचं सरकार आलं आणि आपला राज्य 6 महिन्यात आम्ही पुन्हा पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यास प्रयत्न केले त्याचा आम्हाला समाधान आहे. त्यामुळे आता जो काही मतांचा वर्षाव झाला आहे तो आम्ही जे काम केलं, आम्ही जे निर्णय घेतले आणि त्याचसोबत आम्ही जी सकारात्मकता दाखवली यामुळे हे सगळ झालेलं आहे. म्हणूनच लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली.
"म्हणून मी त्यांचा सख्खा लाडका भाऊ झालो... आणि जे विरोध करत होते ते सावत्र भाऊ होऊन राहिले". मी सांगितल की, सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांनी लक्षात ठेवलं... आणि पुर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली. ही ओळख मला सर्व पदांपेक्षा मोठी वाटते. ही जी ओळख मला निर्माण झाली कोट्यवधी लाडक्या बहिणींमुळे त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. आम्हाला आता बोलत होते कुठे गायब झाले, कुठे नाराज झाले... आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही आहोत आम्ही लोक लढणारे आहोत. लढून काम करणारे आहोत.