Eknath Shinde: "हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही" म्हणतं एकनाथ शिंदेंनी दिलं लाडक्या बहिणींना वचन
आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून महामयीम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम आल्या आहेत त्यांच महाराष्ट्राच्या वतीने मी त्यांच स्वागत करतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बूद्ध यांचा मोठा पुतळा त्याठिकाणी पाहिला. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित महामयीम राज्यपाल आपले सी.पी. राधाकृष्णनजी, लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, महिला व बाल कल्यान मंत्री आपल्या योजनेला सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आदिती तटकरे, संजय भनसोडे यांसह सर्वच मान्यवर आणि याठिकाणी जमलेल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनो मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आज तुमच आगमन उदगीर सारख्या प्राचीन क्षेत्रात झालं आहे.
मी तुम्हाला आदरपूर्वक अवगत करू इच्छितो की, या ठिकाणाला आदीशक्ती माता तुळजा भवानीचा देखील आशीर्वाद आहे. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील माता तुळजा भवानीचा आशीर्वाद आहे म्हणूनच आपण जय शिवाजी आणि जय भवानी असा जयघोष करतो. या क्षेत्राने स्वतंत्र्याची दुसरी लढाई मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये देखील संघर्षपूर्ण योगदान दिलं आहे. या लढाईत आपल्या स्त्रीशक्तीचा देखील योगदान दिले आहे अशा पवित्र क्षेत्रात आपण नारीशक्तीला वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. हे आपलं सौभाग्य आहे लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी आपली महामयीम राष्ट्रपती आज आपल्यासोबत आलेल्या आहेत. महिलांना संधी मिळाली तर त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ शकते. संघर्ष कसा ही असेल परंतू यश हे अनमोल असते आणि आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी याची मिसाल आहेत.
त्यांनी खुप संघर्ष केलेला आहे, त्यांनी गरीबी पाहिली आहे, तसेच असा संघर्षमय जीवन जगत त्यांना आपल्या देशाचा सर्वोच्च पद राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे आणि आपल्या देशाची सेवा करण्याची देखील संधी मिळाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान आहे, तो संविधान मागच्या लोकसभेत बदलू असे खोटे नरेटीव्ह पसरवून लोकांना घाबरवल आणि धमकवल पण मी म्हणून म्हणतो "जब तक सुरज चांद रहेगा डॉ. बाबासाहेब आंबेडकर का संविधान रहेगा". आपल्या संविधानामुळे आपल्या देशाची स्त्री राष्ट्रपती बनली.
मला असं वाटतं की, बहिणींसाठी काढलेली ही लाडकी बहिण योजना अगदी योग्य आहे. महिलांना आधार देणारी ही योजना आहे. या योजनेच्या विरोधात अनेक लोक गेले खोटी आश्वासनं आहेत असं बोललं गेलं तर कोणी कोर्टात देखील गेले. तुम्ही तर काय दिलं नाही आम्ही जर काय देत आहोत तर त्यात का खोडा घालतं आहात. आम्ही काढलेल्या सगळ्या योजना पाहून विरोधकांच्या पायाखाची वाळू सरकली आहे, विरोधकांच्या पोटातं दुखू लागलं आहे, पण किती ही काही झालं तरी ही योजना बंद होणार नाही. ही योजना कायम चालू राहणार असा आमच्या बहिणींना आमचा शब्द आहे. हे देणार सरकार आहे, हे घाणारं सरकार नाही.