BMC Election : नव्या वर्षात एकनाथ शिंदे यांची शिवसेना ॲक्शन मोडवर

BMC Election : नव्या वर्षात एकनाथ शिंदे यांची शिवसेना ॲक्शन मोडवर

नव्या वर्षात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर काम सुरु केले आहे. १०० जागांवर लढण्याची तयारी, ८५ माजी नगरसेवकांचा प्रवेश आणि महाविकास आघाडीला आव्हान.
Published by :
shweta walge
Published on

उमेश करंजकर; नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर सक्रिय होण्यास प्रारंभ केला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे. शिवसेना १०० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. महायुतीतील अन्य पक्षांसोबत एकत्रितपणे लढल्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १०० जागांवर लक्ष ठेवण्याची आशा आहे. या तयारीचा भाग म्हणून, मुंबईमधील सुमारे ८५ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचा दावा आहे की, १०० जागांवर निवडणूक लढवून ९० जागांवर विजय मिळवणार आहेत.

लोकसभा निवडणुकांमध्ये अपयशाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवला, ज्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. विशेषतः, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावर माजी नगरसेवक आले आहेत. याचा फायदा आगामी महानगरपालिका निवडणुकीत होईल, असा विश्वास शिंदेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, महापालिका निवडणुका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला महाविकास आघाडीने एक आव्हान दिले आहे. महाविकास आघाडीने महायुतीला सांगितले आहे की, त्यांनी निवडणुका जाहीर करून त्यावर निर्णय घ्यावा.

विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि महायुती महापालिकेच्या निवडणुकीसाठी आमने-सामने येणार आहे मुंबई महानगरपालिकेचे महत्व या दोन्ही आघाडी आणि युतीला आहे. त्यामुळेच दोन्हीकडून या निवडणुका जिंकण्याच्या वल्गना केल्या जात आहेत मात्र अद्याप तरी महापालिका निवडणुका केव्हा होणार हे कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरच स्पष्ट होईल मात्र निवडणुका घोषित होण्याआधीच मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसलेली दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com