eknath shinde on Shradha Murder case
eknath shinde on Shradha Murder caseTeam Lokshahi

श्रद्धा वालकर हत्येवर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, खूप दुर्दैवी घटना...

महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने निर्घृण हत्या केली.

मागील चार ते पाच दिवसांपासून श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येची प्रचंड चर्चा सुरु आहे. या तरुणीची अत्यतं निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा सर्वच देशभरात निषेध नोंदवला जात आहे. त्याच हत्येवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते.

eknath shinde on Shradha Murder case
मुख्यमंत्र्यांनी दिली इंदू मिल स्मारकाबद्दल महत्वाची माहिती; म्हणाले, निर्धारित वेळेपूर्वी काम...

श्रद्धा वालकर हिच्या हत्येवर एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, “श्रद्धा वालकरची हत्या दिल्लीत झाली आहे. ही आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. दिल्ली पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.” अशी प्रतिक्रिया यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने निर्घृण हत्या केली. इतकंच नाही, तर प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात विल्हेवाट लावली. या घटनेने देशभरात खळबळ उडाली. याप्रकरणी दिल्ली पोलीस कसून तपास करत आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com