Eknath Shinde
Eknath Shinde Team Lokshahi

शिवसैनिक ते महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार नाव, कसा आहे एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण प्रवास?

हिंदुत्ववादी विचारधारेवर वैचारिक जडणघडण झालेले नेते एकनाथ शिंदे... महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं वर्चस्व निर्माण करणारा एकनाथ शिंदे यांचा प्रवासावर एक नजर...
Published by :
Team Lokshahi
Published on

एक सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचं स्थान असलेला सामर्थ्यशाली नेता... एकनाथ शिंदे यांचा अजूनपर्यंतचा प्रवास हा सोप्पा नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ साल हे मोठमोठे धक्के देणारं असंच होतं. एकीकडे भाजपचं १०५ आमदारांचं संख्याबळ घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबतीला घेऊन भल्या पहाटे शपथविधी उरकला. ७२ तासांच्या औटघटकेचं हे सरकार महाराष्ट्राने पाहिलं. महाराष्ट्राच्या या राजकारणाची चर्चा संपूर्ण देशभरात गाजली. त्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शह देत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेसच्या साथीने मुख्यमंत्रीपद भूषवत सरकार चालवलं. मात्र, कट्टर हिंदुत्ववादी विचारधारा असलेल्या शिवसेनाला हे मान्य नव्हतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पक्षातील आमदारांना दुजाभाव मिळत असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. एकनाथ शिंदे यांना पक्षामध्ये अनेकदा दुय्यम स्थान मिळत असल्याची जाणिव खलत होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर जडणघडण झालेल्या हिंदुत्ववादी शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे यांना ठाकरेंची काँग्रेससोबत सुरू असलेली जवळीक मान्य नव्हती.

कुणाच्या ध्यानीमनीही नसताना एकनाथ शिंदेंचं नाव अचानक बघता बघता मोठं होत गेलं. राज्याच्या राजकारणाच्या ते केंद्रस्थानी जाऊन बसले. तसं पाहता एकनाथ शिंदेंचा आजवरचा प्रवास सोप्पा नव्हता. मुख्यमंत्री होण्याआधी शिंदेंना पक्षात कायम दुय्यम स्थान मिळालं. संयुक्त शिवसेनेतही अनेक नेत्यांपैकी ते एक होते. मंत्रिमंडळात इतर अनेकांपैकी एक होते. जून 2002 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान झालं आणि त्याच रात्री शिवसेनेत एक मोठं बंड झालं. आणि राज्याच्या राजकारणाचं पूर्ण चित्रच बदलून गेलं. एकनाथ शिंदेंनी आधी सूरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठली. त्यानंतर शिवसेनेच्या निवडून आलेल्या 56 आमदारांमधले एकेक करुन अनेक आमदारांनी शिंदेंचाच मार्ग निवडला. सुरुवातीला 11 मग 29 आणि सरतेशेवटी 45 आमदार सोबत नेण्याची कामगिरी त्यांनी साधली. एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यानं तेव्हा 105 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चितच होतं. मात्र अचानक सर्व चित्र पलटलं आणि खुद्द फडणवीसांनीच शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचं घोषित केलं. एकनाथ शिंदे यांनी 1 जुलै 2022 रोजी महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. साधारण तीन वर्षांआधी ज्याची कल्पनाही कोणी केली नसती असं राजकारण प्रत्यक्षात आल्यावर त्याच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे राहिल्याचं सर्वांनीच पाहिलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com