बातम्या
एकनाथ शिंदेंची रत्नागिरीत सभा; उष्माघाताचा कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये म्हणून केली विशेष सोय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. रत्नागिरीत त्यांची जंगी सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. प्रमोद महाजन क्रीडा संकुल इथं जाहीर कार्यक्रम होणार आहे.
मात्र विशेष म्हणजे कोणालाही उष्मघाताचा त्रास होऊ नये यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. तसेच, इलेक्ट्रॉल पावडरची दोन पाकिट खुर्चीवर ठेवण्यात आली आहेत. तसेच पाण्याची सोय करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी राज्य सरकारकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.