Eknath Shinde On Uddhav Thackeray : "तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये...." सुरतच्या मेळाव्याबाबत एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर

एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला, पाकिस्तानमध्ये मेळावा पाहिजे होता म्हणत प्रत्युत्तर.
Published by :
Riddhi Vanne

Eknath Shinde Darasa Melava : आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे पार पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा दसरा मेळावा नेस्को येथे पार पडत आहे. एकनाथ शिंदेनी दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव टाकरेंवर जोरदार टीका केली. विरोधाकांनी केलेल्या सुरतच्या मेळाव्याबाबत एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, "काही लोक म्हणतात तुमचा मेळावा सुरतमध्ये पाहिजे होता. अमित शहा बोलवा, पण सुरत हे भारतामध्ये आहे. तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये पाहिजे होता, म्हणजे पाकिस्तानमध्ये हेडलाईन झाली असती. राहूल गांधी सावकरांवर मुद्दाम टीका करतात. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. आता जर बाळासाहेब असते तर, उलट टागून खालून मिरची धुरी दिली असती, हे तुमचं हिंदुत्व, अरे हिंदुत्व म्हणजे टी- शर्ट आहे जे काढल आता मन लागेल तेव्हा घातलं कोणता पक्षप्रमुख आपल्या पक्षात कटकारस्थान करतात, असे कटप्रमुख आहे, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर टोला. मुंबई महाराष्ट्राची मुंबई मराठी माणसांची राहिल, म्हाडाचे रखडलेली प्रकल्प पुन्हा सुरु करत आहोत."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com