एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला; फडणवीसांचा मार्ग मोकळा?
राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, मात्र महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेला माझ्यामुळे अडचण होणार नाही. मोदींनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल, अस म्हणाले आहेत.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
निवडणुकीच्या निकालानंतर आपण पाहीले. राज्यातील जनतेला मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो. हा जो काही विजय मिळवला ही लैंडस्लाइड विक्ट्री आहे.अडीच वर्षात महायुतीने केलेलेल जे काम आहे आणि लोकांनी दाखवलेला विश्वास आहे.
मविआने थांबवलेली कामं पूर्ण केली. मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमनमॅन म्हणून कामं केली. महायुती म्हणून बहीण, शेतकऱ्यांसाठी काम केलं. मोदींनी अडीच वर्षे माझ्यावर विश्वास दाखवला. केंद्रातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पाठिंबा मिळाला. माझ्या कारकिर्दीबाबत मी समाधानी.
एनडीए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपला अंतिम असेल तसा आम्हालाही अंतिम असेल. निर्णय घेताना माझी अडचण आहे का असं वाटू देऊ नका. एकनाथ शिंदे काही अडचण आहे का असं वाटू देऊ नका. सरकार बनवताना माझा अडसर ठेवू नका. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मला मान्य असेल. मी मोदी आणि शाह यांना फोनवर सांगितलं.
जीवन में असली उडान बाकी है अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन अभी तो सारा असमान बाकी है असं देखील शिंदे म्हणाले. अजून खूप काम करायचं आहे. राज्याला विकासाकडे न्यायचं आहे. मोदींनी देशाचं नाव जगभर रोशन केलं. आज देश आत्मनिर्भर झाला आहे. आत्म सन्मान झाला आहे. आपले रिलेशन इतर देशांसोबत डेव्हलप झाले आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. त्यामुळे कोणती कोंडी काही राहू नये हे सांगण्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे वरिष्ठ जे निर्णय घेतील, तो मान्य असेल.
भाजपला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आमची बैठक होणार आहे. भाजपची बैठक होणार आहे. त्यात ते निर्णय घेतील. कोंडी, अडसर, नाराजी नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही. नाराजी नाही. जो निर्णय भाजपचे दिल्लीतील नेते घेतील त्याला आमच्या शिवसेनेचा पाठिंबा असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
