'मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले, पण…”, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

'मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले, पण…”, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात उद्धव ठाकरे यांनी शक्तीप्रदर्शन केल्याचे बघायला मिळाले.
Published by  :
shweta walge

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात उद्धव ठाकरे यांनी शक्तीप्रदर्शन केल्याचे बघायला मिळाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंब्य्राच्या दौऱ्यादरम्यान सरकारवर टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिउत्तर दिले.

ते म्हणाले की, दिवाळीच्या आदल्या दिवशी येऊन अस विघ्न आणणं चुकीचं आहे. दिवाळीच्या आधी त्यांचा फुसका बार निघाला. आमचे नरेश म्हस्केसारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते, आमच्या फटक्यांनी त्यांना परत जावं लागलं. काल ते बरंच काही बोलून गेले, आज मी काही बोलणार नाही, अशी खोचक टीका शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.

जनतेसमोर कोणाचेही काहीच चालत नाही. या सर्व लोकांचा माज जनता येत्या निवडणुकीत उतरवेल. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आरोप करणाऱ्यांना, माज करणाऱ्यांना जनतेने ७ व्या नंबरवर पाठवले. उद्या त्यांचा १० वा नंबरसुद्धा लागू शकतो, अशा शब्दात त्यांनी टीका केली. मागील वर्षी देखील मोठ्या उत्साहात दिवाळी पहाट साजरी झाली. आपले सरकार आल्यानंतर सर्व सणांवरील निर्बंध काढून मोठ्या उत्साहात सण साजरे करण्यास सुरुवात केली. तसेच हिंदू सण असेच साजरे होत राहतील, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी ठाणे शहरातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळचा आस्वाद घेतला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे राज्य प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com