'विघ्नहर्ता' जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील, मुख्यमंत्र्यांची गणेशाचरणी प्रार्थना!

'विघ्नहर्ता' जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील, मुख्यमंत्र्यांची गणेशाचरणी प्रार्थना!

आज लाडक्या बाप्पाचे सर्वत्र मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जात आहे.
Published by :
shweta walge

आज लाडक्या बाप्पाचे सर्वत्र मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी बाप्पासमोर प्रार्थना केली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, "मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो. मी काल जम्मू-काश्मीरमध्ये होतो. श्रीनगरच्या लाल चौकात लोक गणेशोत्सव साजरा करत होते. 'विघ्नहर्ता' महाराष्ट्रातील जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील अशी मी प्रार्थना करतो."

'विघ्नहर्ता' जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील, मुख्यमंत्र्यांची गणेशाचरणी प्रार्थना!
Ganesh Utsav 2023: गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’चं का बरं म्हणतात? जाणून घ्या सुंदर गणेश कथा!

गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी मंदिरापासून घरोघरी गजाननाची प्रतिष्ठापना केली जाते. विघ्नांचा नाश करणाऱ्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्याच्या परंपरेसह भाविक गणेशाची पूजा करतात. राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पांचे आगमन झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com