ताज्या बातम्या
Nandurbar News : उपचाराअभावी वृद्धेचा रुग्णालयाबाहेरच तडफडून मृत्यू! नंदुरबारमध्ये हृदयद्रावक घटना
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा ग्रामीण रुग्णालयामध्ये एका वृद्ध महिलेवर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, तब्येतीत सुधारणा होत नसल्याने रुग्णालयातून बाहेर पडलेली ही वृद्ध महिला रुग्णालयापासून पाचशे मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असहाय्यपणे पडून होती. दरम्यान महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने आज या वृद्ध महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झालाय. आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपचारा अभावी नागरिकांचे जीव जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात.
