Bihar Assembly Elections 2025 : बिहारच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; दोन टप्प्यांत होणार मतदान तर, 'या' तारखेला होणार मतमोजणी
थोडक्यात
बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांची धुरा आता अधिकृतपणे सुरु
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज (6 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली.
बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर
Big Breaking : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांची धुरा आता अधिकृतपणे सुरु झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज (6 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. यंदाच्या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार असून, मतदान 6 आणि 11 नोव्हेंबरला होईल. तर मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे.
दोन टप्प्यांत निवडणुका, 14 नोव्हेंबरला निकाल
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, “बिहारमधील निवडणुका यावेळी कमी टप्प्यांत पार पडतील.”
पहिला टप्पा मतदान: 6 नोव्हेंबर 2025
दुसरा टप्पा मतदान: 11 नोव्हेंबर 2025
मतमोजणी: 14 नोव्हेंबर 2025 - बिहार विधानसभेचा 243 सदस्यीय कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी नवीन विधानसभा गठीत होणार आहे.“22 वर्षांनंतर मतदार यादी शुद्ध” सीईसी ज्ञानेश कुमार - पत्रकार परिषदेत बोलताना सीईसी ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, “स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अंतर्गत बिहारमधील मतदार याद्या पूर्णपणे अद्ययावत आणि शुद्ध करण्यात आल्या आहेत. गेल्या 2 वर्षांत पहिल्यांदाच इतक्या व्यापक प्रमाणावर ही प्रक्रिया पार पडली आहे.” यासाठी राज्यभरातील 243 मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि 90,207 बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांनी काम केले. त्यांनी मतदार याद्या पडताळून, नव्या नावांची नोंद आणि अपात्रांची वजावट केली.
मतदारांसाठी हेल्पलाईन – 1950
ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, “कोणत्याही मतदाराला शंका किंवा तक्रार असल्यास 1950 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.” तसेच मतदारांनी आपल्या नावाची मतदार यादीत खात्री करून घ्यावी आणि नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
रंगीत फोटोसह नवीन मतदार ओळखपत्र-
सीईसी यांनी सांगितले की, “या वेळी मतदार ओळखपत्रांवर काळ्या-पांढऱ्या छायाचित्रांऐवजी रंगीत छायाचित्रे असतील.” नवीन मतदारांना किंवा पत्ता बदललेल्या मतदारांना १५ दिवसांच्या आत नवीन EPIC कार्ड देण्यात येणार आहे100 वर्षांवरील मतदारही सक्रिय - निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये १४,००० मतदार शंभर वर्षांवरील आहेत. ही संख्या बिहारमधील लोकशाही सहभागाचे अनोखे उदाहरण असल्याचे आयोगाने सांगितले.
7.42 कोटी मतदार, 90,712 मतदान केंद्रे - बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत. यासाठी 90,712 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती सीईसी ज्ञानेश कुमार यांनी दिली.
कायदोबदलावर विशेष लक्ष - निवडणुका सुरळीत पार पडाव्यात म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस व प्रशासन यांच्याशी समन्वय साधण्यात आला आहे. “आमचं उद्दिष्ट आहे की या निवडणुका बिहारच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट ठराव्यात,” असे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले. राजकीय हालचालींना वेग - निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर बिहारच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांनी रविवारी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी बैठक घेतली असून, येत्या काही दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल. तेजस्वी यादव या आघाडीचे समन्वय समितीप्रमुख आहेत.
निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट पारदर्शक, समावेशक मतदान सीईसी ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, “सर्व राजकीय पक्षांना अंतिम मतदार यादी पुरवण्यात आली आहे. कोणत्याही शंकेसाठी ते हरकती नोंदवू शकतात. पारदर्शक आणि समावेशक निवडणूक प्रक्रिया राबवणे हे आमचे ध्येय आहे.” एकूणात, बिहार निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता कोणाच्या हातात जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.